PM Matruvandana Yojana 2024 नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत महिलांना आता सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि हे सहा हजार रुपये मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज कोठे करावा यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात किंवा किती दिवसांमध्ये तुम्हाला पैसे मिळतील या योजनेसाठी लाभार्थी कोण आणि नेमका जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर अर्ज कोठे करायचा याविषयी सविस्तर संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत .
तुम्हाला जर सहा हजार रुपये हवे असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेविषयी माहिती असणे आवश्यक आहे आता 2 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता ही योजना का सुरू केली असेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण माता मृत्यू कमी होणं तसेच बालमृत्यू कमी व्हावं या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे.PM Matruvandana Yojana 2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० राज्यात ९ ऑक्टोबर २०२३ लागू झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व आरोग्य सेविकांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व ने आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये ने ऑनलाइन नवीन लाभार्थी नोंदणी व पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बैंक (आयपीपीबी) खाते उघडणेबाबत.
PM Matruvandana Yojana 2024 माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केलेली आहे.
Matruvandana Yojana कोणाला दिला जातो लाभ?
या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यांसाठी ५ हजार रुपयांचा दोन टप्प्यात तसेच दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास ६ हजार रुपयांचा लाभ एकाच टप्यात थेट आधार लिंक व डीबीटी (एनपीसीआय) लिंक असलेल्या खात्यात जमा केली जाते. ही योजना शासकीय सेवेत, खासगी सेवेत किया ज्या मातेला ६ महिन्यांची प्रसूती रजा मंजूर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.PM Matruvandana Yojana 2024